पडघा, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली येथील समतानगरमध्ये ग्रामपंचायत निधी आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य दुमजली समता बुद्धविहाराचा उद्घाटन सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी समतानगरच्या प्रवेशद्वारापासून बुद्धविहारापर्यंत धम्म प्रभातफेरी काढण्यात आली. बुद्धविहाराच्या उभारणीसाठी जात, पात आणि धर्माचा विचार न करता योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार श्याम दोंदे यांनी प्रास्ताविकात मानले. बुद्धविहार केवळ प्रार्थना केंद्र न राहता विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र व्हावे, अशी अपेक्षाही कपिल पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी बुद्धविहाराच्या उभारणीसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या अश्विनलो कशीवले, बुद्धविहारासाठी सुबक मूर्ती उपलब्ध करून देणारे ग्रामपंचायत अधिकारी जयेश थोरात आणि सेंद्रिय रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्याबद्दल निकिता कशीवले यांचा कपिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पडघा सोसायटीचे माजी सभापती श्रीकांत गायकर, उपजिल्हाप्रमुख विष्णू चंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, माजी मुख्याध्यापक काशीनाथ दोंदे, प्रशासक प्रिया पाटील, श्याम दोंदे, पोलिस निरीक्षक पंकज गिरी, भास्कर जाधव, मनोहर ठाकरे, सरपंच अन्वर पिंजारी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव, टीडीसी बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर दोंदे, कृषी पर्यवेक्षक विवेक दोंदे, माजी सरपंच सोहराब गुजर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. जियाद गुजर, अविष्कार दोंदे, निखिल जाधव, अजय कशीवले आणि अशोक कशीवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.