मुंबई

उपायुक्तांच्या खात्यांमध्ये फेरबदल

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी उपायुक्तांच्या विभागीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने उपायुक्त मधुकर बोडके यांना सरकारच्या मूळ सेवेत परत पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील विविध विभागांच्या जबाबदाऱ्या उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे आणि जितेंद्र निकम यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी जारी केले. या फेरबदलामुळे महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांचे कामकाज नव्या खातेवाटपानुसार चालणार आहे.

ठाणे महापालिकेत सरकारकडून आलेल्या उपायुक्त अधिकाऱ्यांकडे विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. अशातच बोडके यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारकडे पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या विविध विभागांच्या जबाबदाऱ्या इतर तीन उपायुक्तांकडे वर्ग करण्यात आले. या जबाबदाऱ्या देताना, उपायुक्तांच्या विभागीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहे. त्यानुसार उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे मुंब्रा, दिवा आणि कळवा प्रभाग समित्यांसह क्लस्टर सेल, सुरक्षा विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, निवडणूक विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग यासह बोडके यांच्घयाकडे असलेला नकचरा व्यवस्थापन विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेतील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे आणि विभागांमधील समन्वय वाढावा, या उद्देशाने हे खातेवाटप करण्यात आले आहे. हा आदेश तत्काळ लागू करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

अतिक्रमण, आरोग्य, उद्यान विभागाचे फेरवाटप
उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडे उपायुक्त जितेंद्र निकम यांच्याकडे असलेला अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग देण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य विभाग, भांडार विभाग, परवाना विभाग, कार्यशाळा आणि पर्यावरण विभागाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. तर उपायुक्त जितेंद्र निकम यांच्याकडे नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समित्यांसह बोडके यांच्याकडे असलेला उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, जकात विभाग व स्थानिक संस्था कर, अभिलेख कक्ष व नागरी सुविधा केंद्र, जनगणना विभाग आणि जाहिरात विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शिळे अन्न खाल्याने तेरा जणांना विषबाधा; तिघांवर उपचार सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT