मुंबई

अंधेरीतील आगीत दोघांचा मृत्यू

CD

अंधेरीतील आगीत दोघांचा मृत्यू
ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी

मुंबई, ता. २१ : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या राजेश कुमार कनोजिया (वय २९) आणि मुरली गौड (४०) यांचा अंधेरीतील आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजल्याने त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले.


साकीनाका येथील खैराणी रोडवरील अब्दुल रशीद कंपाउंडमध्ये मंगळवारी (ता. २०) सायंकाळी आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. आगीने काही वेळातच सुमारे ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि चाळीतील काही भागांना वेढले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत राजेश आणि मुरली यांच्या मृत्यूमुळे दोन कुटुंबांचा आधार हरपला आहे. राजेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, तर मुरली यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे लहान मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले असून, आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या नातेवाइकांसमोर उभा राहिला आहे, तर मुरली गौड यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील लौहरौली गावात राहते. त्यांची बहीण विजयलक्ष्मी यांनी सांगितले की, मुरली मुंबईत काम करून गावाकडे पैसे पाठवत असे, या दुर्घटनेमुळे मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. मुरली यांचा मृत्यू कामाच्या ठिकाणी झाल्याने त्यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
राजेश कुमार कनोजिया हे उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी होते. त्यांचे भाऊ अखिलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आगीची दुर्घटना घडलेल्या कंपनीतच काम करत होते. ते पत्नी आणि दोन लहान मुलांसह साकीनाका येथे भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेश यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT