मुंबई

जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला; तिघांना अटक

CD

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : तालुक्यातील माणकोली परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी जितेंद्र पाल (वय ३६), हरेश दुबले (वय ३२) आणि राहुल गोंड (वय २८) या तिघांना अटक केली आहे. या हल्ल्यात आदित्य दुबे (वय २५) हा तरुण जखमी झाला असून, त्याच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य दुबे हे गरबा खेळून मित्रांसोबत घरी जात असताना आरोपींनी पाईपलाइन रस्त्यावर त्यांना अडवले. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी एका आरोपीने दुबे यांच्या डोके आणि पोटावर चाकूने वार केला. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. यापूर्वी झालेल्या भांडणाच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का गेला होता, याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जितेंद्र पाल, हरेश दुबले, राहुल गोंड, सुनील वर्मा आणि अन्य पाच ते सहा जणांविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक केली असून, नारपोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शिळे अन्न खाल्याने तेरा जणांना विषबाधा; तिघांवर उपचार सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT