मुंबई

महिलांना स्वावलंबनाचा मंत्र

CD

महिलांना स्वावलंबनाचा मंत्र

महिला आरोग्य, बालपोषण, सायबर सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबनावर मार्गदर्शन

जव्हार, ता. २१ (बातमीदार) : महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, बालकांचे कुपोषण रोखणे आणि महिलांना शासकीय योजनांची माहिती देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने बाळकापरा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजना, जव्हार-१ प्रकल्पांतर्गत साकुर-१, साकुर-२ आणि पवारपाडा बीट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात महिला आरोग्य, बालपोषण, बालविवाहाचे दुष्परिणाम, रोजगाराच्या संधी, कायदेशीर हक्क आणि सायबर सुरक्षेबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सहाय्यक गटविकास अधिकारी तथा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संदेश दुमाडा यांनी बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी सकस व संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. बालकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच कुपोषणाला प्रतिबंध करण्यासाठी पालकांनी आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी विकास विभागाच्या आदि सेवा केंद्र योजनेअंतर्गत महिलांसाठी उपलब्ध शासकीय योजना, रोजगाराच्या संधी आणि लघुउद्योगांबाबत प्रदीप राठोड यांनी माहिती दिली. शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ उठवावा आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे त्यांनी सांगितले.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी भोये यांनी महिला आरोग्य, बालसंगोपन तसेच बालविवाहामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांविषयी मार्गदर्शन केले. ॲड. स्वप्निला सावंत यांनी सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अनोळखी फोन, संशयास्पद लिंक, ओटीपीची मागणी आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. डॉ. भावना घोलप यांनी महिलांचे कायदेशीर हक्क, आत्मविश्वास आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.

मेळाव्याला जव्हार-२ प्रकल्पाच्या अधिकारी जागृती किरकिरे, कासटवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या चंदा भुसारा आणि सदस्य नितीन चौधरी उपस्थित होते. मुख्यसेविका सुंदर भोये, प्राजक्ता शेळके, प्रथम फाउंडेशनचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि परिसरातील महिलांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. आशा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

Velhe News : किल्ले राजगडवर 'मर्दानी दसरा' संपन्न; राजगडावर शेकडो दुर्ग सेवकांची उपस्थिती

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Ausa Crime : औसा हादरले! मदत केल्याच्या कारणावरून भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT