मुंबई

सणासुदीत नियुक्त १० टक्के कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती : इंडीड

CD

सणासुदीत नियुक्त १० टक्के कर्मचाऱ्यांना
कायमस्वरूपी करणार : इंडीड
मुंबई, ता. २१ : सणासुदीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किमान १० टक्के कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर ठेवण्याची कंपन्यांची तयारी आहे. या कर्मचाऱ्यांना कराराची मुदतवाढ देणे, कराराचे नूतनीकरण करणे किंवा दीर्घकालीन पदावर नियुक्त करणे, असे पर्याय कंपन्यांकडून विचारात घेतले जात आहेत. इंडीडच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
देशात सणासुदीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपातील नोकरभरती मोठ्या प्रमाणात होते; मात्र या काळात नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जातेच, असे नाही. इंडीडच्या ‘फेस्टिव्हल सीझन आउटलुक २०२६’ या ताज्या अहवालानुसार, २०२६ च्या सणासुदीच्या काळात नियुक्त केलेल्या किमान १० टक्के कर्मचाऱ्यांना पुढेही कामावर कायम ठेवण्याची ७४ टक्के नियोक्त्यांना अपेक्षा आहे. वस्तूंचे वितरण, गोदाम व्यवस्थापन, वाहतूक आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ही प्रवृत्ती दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळातील नोकरभरती वाढेल, अशी ५३ टक्के नियोक्त्यांना अपेक्षा आहे.
.......
चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढेही कामावर कायम ठेवण्याच्या संधी निर्माण केल्या, तर सणासुदीचा काळ अशा गुणवंत प्रतिभावान व्यक्तींना शोधण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो, ज्यांच्याकडे अन्यथा आपले लक्ष गेले नसते.
- साशी कुमार, व्यवस्थापकीय संचालक, इंडीड इंडिया

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT