मुंबई

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला विज्ञानाची जोड

CD

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला विज्ञानाची जोड
घाटकोपरमध्ये एन वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शन; ६७ शाळांचे २४६ प्रकल्प सहभागी
घाटकोपर ता. २२ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्व येथे एन वॉर्डस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग आणि एन वॉर्ड विज्ञान प्रदर्शन व सहशालेय उपक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात ६७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, विविध गटांतील एकूण २४६ प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष ही या विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना आहे. २१ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत घाटकोपर पूर्व येथील श्री डी. जे. दोशी गुरुकुल इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देतानाच विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील उपयोग, तंत्रज्ञानातील प्रगती आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात येत आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रमेश सातदिवे, अधीक्षक भक्ती गोरे, शिक्षण उपनिरीक्षक गणेश खाडे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक संतोष कंटे, संचालक बिपीन पटेल आणि डॉ. उन्नती पडालिया उपस्थित होते.
या वेळी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रमेश सातदिवे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व विशद केले. विज्ञान शिकल्यामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर प्रश्न विचारण्याची, निरीक्षण करण्याची आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण उपनिरीक्षक भक्ती गोरे यांनी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केल्‍याबद्दल कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

SCROLL FOR NEXT