राजस्थान पोलिसांचा उल्हासनगरमध्ये छापा
व्यायामशाळेच्या प्रशिक्षकाला फसवणूक प्रकरणात अटक
उल्हासनगर, ता.२२(वार्ताहर)ः निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला २ कोटी १२ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी उल्हासनगरच्या व्यायामशाळेतील प्रशिक्षकाला अटक केली आहे.
राजस्थानमधील जयपूर येथे निवृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्याची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली२ कोटी १२ लाख १० हजारांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात राजस्थान सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील जिम ट्रेनर रवींद्र सिंह ऊर्फ अक्षयला अटक केली. सरकारी अधिकारी असल्याचे भासवत निवृत्त अधिकाऱ्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच बनावट अटक वॉरंट पाठवून अटकेच्या भीतीने २ कोटी १२ लाख १० हजार रुपये उकळण्यात आले होते.
---------------------------
‘देवा’नावाने आर्थिक व्यवहार
राजस्थानचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. के. सिंह यांच्या माहितीनुसार रवींद्रची टेलिग्रामवरील ‘ ब्रो पे’ चॅनेलद्वारे सायबर गुन्हेगारांशी ओळख झाली होती. आर्थिक मोबदल्याच्या प्रलोभनातून उल्हासनगरमधील कमल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये अन्य आरोपी रोहित कट्कधोंडची राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच ‘देवा’ या बनावट नावाने स्वतंत्र सिमकार्ड वापरून बँक खात्यांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची माहिती दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.