मुंबई

सुतारवाडीत उद्योगांची भरभराट

CD

सुतारवाडीत उद्योगांची भरभराट
रोजगाराच्या संधींसह रस्ते विकासाला प्राधान्य
रोहा, ता. २२ (बातमीदार) : सुतारवाडी परिसरात प्रदूषणविरहित कारखाने उभारण्यात येतील. तसेच रस्ते आणि पुलांची कामे मार्गी लावून परिसराचा विकास केला जाईल, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली. येरळ ग्रामपंचायतीच्या बापूसाहेब रसाळ सभागृहात आयोजित दसरा स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
तटकरे म्हणाले की, ५६ वर्षांपूर्वी त्यांचे वडील दत्ताजीराव गणपत तटकरे आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब रसाळ यांनी या स्नेहसंमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. ही परंपरा अखंड सुरू ठेवता येत असल्याचा अभिमान आहे. परिसरात उद्योग सुरू होत असून, तरुणांनी व्यवसायाच्या संधींचा लाभ घ्यावा. महिलांनीही लघुउद्योग सुरू करून स्वावलंबी व्हावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विकासकामांबाबत चर्चा केल्याचे सांगून, मंत्री नितेश राणे यांच्याशीही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले.

रस्ते, पुलांच्या कामांना गती
कोलाड ते विळा-भागाड रस्त्याचे लवकरच काँक्रीटीकरण होणार असून, येरळ येथील पूल नव्याने बांधण्यात येईल, असे तटकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक पद्धतीने आपट्याची पाने देऊन सोनं लुटण्यात आले. या वेळी उपसभापती संजय मांडलुस्कर, सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच कविता तटकरे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : सुतारवाडी येथील दसरा स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

SCROLL FOR NEXT