मुंबई

महिला सक्षमीकरणाला बळ

CD

महिला सक्षमीकरणाला बळ
मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर योजना; बचत गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : मुलींची शाळेतील गळती रोखून उपस्थिती वाढविणे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, या उद्देशाने पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मुलींसाठी उपस्थिती भत्ता व शैक्षणिक प्रोत्साहन योजना तसेच महिला बचत गटांना व्यावसायिक साधनसामग्री खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा आणि क्रीडा सुविधांबाबतही चर्चा झाली.
समितीची सभा सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २१) महापौर कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली. या वेळी उपायुक्त डॉ. रूपाली माने, विभागप्रमुख कीर्ती महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा चांडक, समिती सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील सभेतील विषयांवरील कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाला बळ देणे ही समितीची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, नियमित उपस्थिती वाढावी आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, यासाठी उपस्थिती भत्ता व प्रोत्साहनपर योजनेला मंजुरी देण्यात आली.

बचत गटांना व्यवसायाची संधी
महिला बचत गटांना शिलाई मशीन, घरघंटी, मिरची कांडप मशीन, भाकरी मशीन, पत्रावळी मशीन यांसारखी व्यावसायिक साधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामुळे महिलांना व्यवसायवृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

व्यायामशाळांचा विषय ऐरणीवर
महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यायामशाळा आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सभेत चर्चा झाली. महिलांचा व्यायाम आणि क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी या सुविधांचा विचार करण्याची सूचना सदस्यांनी केली.

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT