मीनाक्षी, राजेंद्र शिंदे यांना
पक्षातून बडतर्फ करा!
जयनाथ पूर्णेकर यांचे पक्षश्रेष्ठींना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून त्यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी गुरुवारी (ता. २२) मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी शिंदे दाम्पत्याला पक्षातून बडतर्फ करावे, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा भविष्यात पक्षश्रेष्ठींवरही आरोप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
जयनाथ पूर्णेकर यांनी गुरुवारी ठाणे खंडणीविरोधी पथक कार्यालयात येऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयनाथ पूर्णेकर यांनी हत्येच्या तपासात समोर आलेल्या व्हिडिओंचा उल्लेख केला. तपासाच्या नावाखाली केवळ नाटक करून आमच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, ज्या मित्रांसोबत राजेंद्र शिंदे राहिले, त्याच मित्राचे घर त्यांनी उद्ध्वस्त केल्याचा आरोपही जयनाथ पूर्णेकर यांनी केला. तसेच आम्हाला न्याय मिळाला नाही तर रान पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत त्यांनी याप्रकरणी न्यायासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.