मुंबई

''तपास नोंदवही'' योग्य स्थितीत नसल्यास खातेनिहाय चौकशी

CD

''तपास नोंदवही'' योग्य स्थितीत
नसल्यास खातेनिहाय चौकशी
पोलीस महासंचालकांची उच्च न्यायालयात माहिती 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : खटल्याच्या तपासाच्या तपशीलाशी संबंधित ''तपास नोंदवही'' (केस डायरी) योग्य स्थितीत न ठेवणे गंभीर कृती मानले जाईल. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करताना कृतीमागील कारण गंभीर असल्यास खातेनिहाय चौकशीसारखी कठोर कारवाईही केली जाईल, अशी माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे गुरुवारी (ता.२२) उच्च न्यायालयात दिली. पालघरस्थित खासगी रुग्णालयातील धुडगूस प्रकरणी पोलीस महासंचालकांनी हे स्पष्टीकरण दिले. 
पालघर प्रकरणातील ''तपास नोंदवही'' योग्य स्थितीत न ठेवल्यावरून आणि संबंधित अधिकाऱ्यावर निव्वळ वेतन रोखीची कारवाईच्या कारवाईवरून न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले होते. तसेच, ''तपास नोंदवही''च्या देखभालीबाबत उच्च न्यायालय आणि पोलीस महासंचालकांनी वारंवार दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्याला वेतनरोखीसारखी सौम्य शिक्षा देणे कितपत योग्य? असा प्रश्न करून पोलीस महासंचालकांनाच प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. 
त्या पार्श्वभूमीवर, न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. ''तपास नोंदवही'' योग्य स्थितीत न ठेवणे यापुढे गंभीर कृती मानली जाणार असल्याचेही त्यांच्याकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, या कृतीमागील कारण आणि गांभीर्य विचारात घेऊन त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस महासंचालकांच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले.

पालघरप्रकरणी पुढील आठवड्यात आरोपपत्र
पालघरस्थित डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणी एकूण २३ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. पडताळणीसाठी वरिष्ठांकडे पाठवले असून पुढील आठवड्यात आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला दिली. या वेळी या प्रकरणातही डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाप्रमाणे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जावी. तसेच, आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपींवर आरोपनिश्चिती करून खटल्याची सुनावणी दैनंदिन पद्धतीने घेण्यात यावी, असे या प्रकरणी न्यायमित्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले वकील निरंजन मुंदरगी यांनी सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT