मुंबई

तरुणीच्या घरी बोलावून माजी वर्गमित्राला बेदम मारहाण; मोबाइल हिसकावल्याचा आरोप

CD

वर्गमित्रिणीच्या घरी बोलावून तरुणाला बेदम मारहाण
लाकडी वस्तूसह बेल्टने चौघांचा हल्ला
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाला त्याच्या वर्गमैत्रिणीच्या घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळे आणि कानाजवळ दुखापत झाली असून, त्याचा मोबाइल हिसकावून घेतल्याचाही आरोप आहे. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, रामबाग परिसरात राहणारा सुशांत रवींद्र ठाकरे (२३) हा बदलापूर येथे काम करतो. १९ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १.१५ वाजता त्याला त्याची वर्गमैत्रीण श्रुती घोलप हिच्या मोबाइलवरून फोन आला. या वेळी प्रणव महाजन याने शिवीगाळ करून त्याला दुर्गाडी चौकात बोलावण्यात आले. त्यानंतर श्रुतीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुशांत रात्री सुमारे १.३० वाजता अहिल्याबाई चौकातील सप्तश्रृंगी इमारतीत तिच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याला चौघांकडून मारहाण केल्याचे सांगण्यात आली.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

डोळा, कानाजवळ वार; गळा दाबल्याचाही आरोप
सुशांतच्या तक्रारीनुसार, घरात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रणव महाजन याने लाकडी वस्तूने त्याच्या डाव्या डोळ्याजवळ आणि उजव्या कानाच्या वरच्या भागात आघात केले. अजय राठोड याने गळा दाबला, शीतल घोलप हिने बेल्टने पाठ आणि पोटावर मारहाण केली, तर योगेश घोलप याने चेहरा आणि डोळ्याच्या आसपास मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या मारहाणीत सुशांत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT