मुंबई

कल्याण-डोंबिवलीत २७ ऑक्टोबरला जंतनाशक मोहीम

CD

कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एक ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे कृमीदोषापासून संरक्षण करण्यासाठी २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी औषध घेऊ न शकलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
कृमीदोषामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, कुपोषण, अशक्तपणा आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, शाळेतील उपस्थितीवर तसेच शारीरिक आणि बौद्धिक विकासावर होतो. बालकांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या समन्वयातून ही मोहीम पार पडणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये पात्र बालकांना जंतनाशक औषधाची गोळी देण्यात येईल.
महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना रामोळे यांनी पालकांना आपल्या मुलांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे. औषध घेण्यासाठी येताना मुलांनी नाश्ता किंवा जेवण करून यावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. पालकांनी सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT