मुंबई

जव्हार-मोखाड्यात वीजेचा लपंडाव

CD

जव्हार, मोखाड्यात विजेचा लपंडाव
वारंवार तांत्रिक बिघाड; ‘ऑक्टोबर हीट’मध्ये नागरिक उकाड्याने त्रस्त
मोखाडा, ता. २३ (बातमीदार) : जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील ४० हजारांहून अधिक वीजग्राहकांना सध्या तीव्र वीजटंचाई आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. डहाणू येथील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून गंजाड आणि सूर्यानगर उपकेंद्रांमार्गे होणाऱ्या वीजपुरवठ्यात वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने दोन्ही तालुक्यांतील वीजसेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर हीटच्या वाढत्या उकाड्यात त्यातच रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही महावितरणकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

व्यवसायांना फटका आणि रात्रीचा उकाडा
गंजाड ते सूर्यानगरदरम्यानच्या वीजवाहिन्यांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत. तसेच ही वीजवाहिनी जंगलपट्टीतून जात असल्याने झाडांच्या फांद्या व इतर नैसर्गिक अडचणींमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याचा थेट परिणाम घरगुती कामकाजासह स्थानिक व्यावसायिक व्यवहारांवरही होत आहे. दिवसभराच्या कामानंतर रात्री विश्रांतीच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. या दीर्घकालीन समस्येवर महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बोराळे केंद्राची वीजवाहिनी रखडली
जव्हार आणि मोखाडा तालुक्यांची वीज समस्या सोडवण्यासाठी जव्हार तालुक्यातील बोराळे येथे १३२ केव्ही विद्युत केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला डहाणूहून थेट वीजपुरवठा करण्याचे नियोजन होते. मात्र, वन विभागाच्या परवानग्या आणि कांदळवनाशी (मॅन्ग्रोव्हज) संबंधित तांत्रिक अडथळ्यांमुळे या वीजवाहिनीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज

प्रशासकीय पातळीवर वन विभाग आणि महावितरणमधील समन्वयाच्या अभावामुळे बोराळे केंद्राचे काम रखडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा करून आवश्यक परवानग्या मिळवून द्याव्यात आणि हे काम पूर्ण करावे, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील जनतेकडून केली जात आहे.
-------------------
बोराळे केंद्रातून थेट वीजपुरवठा सुरू झाल्यास जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मिटेल आणि वीजसेवा अधिक स्थिर व सुरळीत होईल.
- महावितरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

जमिनीवर बसला, वरपून कोळंबीचं कालवण खाल्लं! स्मिता यांनी सांगितला रणबीर कपूरचा तो किस्सा, म्हणाल्या- तो इतका...

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

दुर्घटनांमध्ये ७२० मृत्यू! साडेसहा वर्षांत २,४०८ जखमी, आगींमध्ये सर्वाधिक हानी; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT