गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी
वेदांता हॉस्पिटलचा पुढाकार; ने-आण सुविधाही मिळणार
कासा, ता. २३ (बातमीदार) : डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील गरोदर मातांना प्रसूतीपूर्व तपासण्या सुलभपणे करता याव्यात, यासाठी वेदांता हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने मोफत सोनोग्राफी आणि रुग्णालयात ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दुर्गम गावांतील महिलांना सोनोग्राफीसाठी दूरच्या रुग्णालयांत जावे लागते. वाहतुकीची कमतरता, प्रवासाचा खर्च आणि वेळ यांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी दर गुरुवारी वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गरोदर मातांना वेळेत तपासण्या करून घेणे शक्य होणार आहे.
“आर्थिक अडचणी किंवा वाहतुकीच्या गैरसोयीमुळे दुर्गम भागातील गरोदर माता आवश्यक तपासण्यांपासून वंचित राहू नयेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मोफत सोनोग्राफी आणि ये-जा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे,” असे वेदांता हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद खंडेलवाल यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मातांना आवश्यक आरोग्यसेवा मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.