मुंबई

पूर्णेकर हत्याकांडात नवा खुलासा; हल्ल्याचे चॉपर चोरबाजारातील !

CD

पूर्णेकरांवरील हल्ल्याचे चॉपर चोरबाजारातले
२५० रुपयांचे तीन चॉपर हस्तगत; देशी पिस्तुले उत्तर प्रदेशातून खरेदी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही देशी पिस्तुले उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आली होती, तर हल्ल्यासाठी वापरलेले चॉपर मुंबईतील चोरबाजारातून विकत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. या तीन चॉपरची एकूण किंमत २०० ते २५० रुपये असल्याची माहिती आरोपींनी तपासादरम्यान दिल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पूर्णेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली. तसेच तपासात पोलिसांना दोन पिस्तूल, दोन चॉपर, मोबाईल, आणि चार वाहनांसह दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे. याचदरम्यान, या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांच्या खरेदीचा तपशील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. गोळीबारासाठी देशी पिस्तुलांची उत्तर प्रदेशातून प्रत्येकी १५ हजार रुपयांमध्ये वैयक्तिक कारणास्तव खरेदी केली, तर चॉपरची मुंबईतील चोरबाजारातून खरेदी केल्याचे उघजकीस आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य पुराव्यांच्या आधारे एसआयटीकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी शस्त्रे कोणाकडून खरेदी केली, या व्यवहारांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासातून उलगडा होणे अपेक्षित असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू या दोघांची पोलिस कोठडी शनिवारी संपणार आहे. त्यामुळे त्या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे.
-------------------
एसआयटी पथक मुळशीला
प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या दोन व्हिडिओंच्या अनुषंगाने राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने चौकशी केली. यातील एका व्हिडिओमध्ये आरोपी निखिल यादव आणि राजेंद्र शिंदे बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानुसार, एसआयटी पथक लवकरच मुळशी येथे जाऊन संबंधित ठिकाणाची माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT