मुंबई

गुरूच्या वक्री-मार्गी गतीमुळे त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा

CD

गुरूच्या वक्री-मार्गी गतीमुळे
त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा
२०२७ मध्ये तीन अमृतस्नाने तर २०२८ पर्यंत पर्वकाल
वंशिका चाचे ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होणार आहे. गुरू ग्रहाच्या वक्री-मार्गी गतीमुळे यंदा तीन टप्प्यांत सिंहस्थ कुंभपर्व साजरे होणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पर्वाला ‘त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा’ असे संबोधले जात आहे. पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ‘सकाळ’शी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. सिंहस्थ ध्वजारोहणाचा शुभारंभ शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी होणार आहे.
गुरू ग्रह सिंह राशीत असताना गोदावरी नदीच्या काठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, अशी परंपरा आहे. यंदा गुरू ग्रहाच्या वक्री आणि मार्गी गतीमुळे तो तीन वेळा सिंह राशीत राहणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे पर्वही तीन कालखंडांत विभागले गेले. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला पर्वकाल ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ असा आहे. दुसरा टप्पा २५ जून ते २६ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत असेल, तर तिसरा टप्पा २८ फेब्रुवारी ते २४ जुलै २०२८ या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक, साधू, संत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे.

तीन अमृतस्नाने २०२७ मध्ये
सिंहस्थ कुंभपर्वातील अमृतस्नानांना विशेष महत्त्व आहे. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले अमृतस्नान सोमवार, २ ऑगस्ट २०२७ रोजी सोमवती अमावास्येला, दुसरे अमृतस्नान मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ रोजी श्रावण अमावास्येला, तर तिसरे अमृतस्नान शनिवार, ११ सप्टेंबर २०२७ रोजी परिवर्तिनी एकादशीला होणार आहे. सिंहस्थाची समाप्ती २४ जुलै २०२८ रोजी होईल.

कुंभमेळ्याची पौराणिक परंपरा
समुद्रमंथनातून प्राप्त अमृतकुंभाशी कुंभमेळ्याची पौराणिक कथा जोडलेली आहे. अमृतकुंभातून प्रयागराज, नाशिक-त्र्यंबकेश्वर, हरिद्वार आणि उज्जैन या चार तीर्थक्षेत्रांत अमृताचे थेंब पडल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी ठरावीक ग्रहस्थितीनुसार कुंभमेळा भरतो. कुंभपर्वात नदीस्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. २०२६ मधील पर्वकाळात ५ नोव्हेंबरला रमा एकादशी, २० व २१ नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी, २३ नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आणि २४ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा हे महत्त्वाचे दिवस आहेत. यापूर्वी २००३-०४ आणि २०१५-१६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरला होता. आगामी त्रिखंडी पर्वानंतर २०३८ ते २०४० या काळात पुन्हा त्रिखंडी सिंहस्थ होण्याची शक्यता सोमण यांनी नमूद केली.

त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२०२८

महत्त्वाच्या तारखा
तपशील दिनांक- कार्यकाल
सिंहस्थ ध्वजारोहण व प्रारंभ ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२:०२
पहिला पर्वकाल ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७
दुसरा पर्वकाल २५ जून २०२७ ते २६ नोव्हेंबर २०२७
तिसरा पर्वकाल २८ फेब्रुवारी २०२८ ते २४ जुलै २०२८
पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७- सोमवती अमावस्या
दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७- श्रावण अमावस्या
तिसरे अमृतस्नान ११ सप्टेंबर २०२७- परिवर्तिनी एकादशी
सिंहस्थ कुंभमेळ्याची समाप्ती २४ जुलै २०२८


इतर तीर्थक्षेत्रांतील आगामी कुंभमेळे
तीर्थक्षेत्र आगामी कालावधी
उज्जैन १३ एप्रिल २०२८ ते १४ मे २०२८
हरिद्वार १३ एप्रिल २०३३ ते १३ मे २०३३
प्रयागराज २०३६-३७ मध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT