मुंबई

मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाविरोधात मुंबई विद्यापीठात आंदोलन

CD

मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाविरोधात विद्यापीठात आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अटकेसह एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
मुंबई, ता. २३ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, जुन्या मतदार याद्यांच्या आधारे फेरनिवडणुका घ्याव्यात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना अटक करावी, या मागण्यांसाठी दिशा विद्यार्थी संघटना आणि भगतसिंग जन अधिकार यात्रा यांच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी २०२३ चा निवडणूक कायदा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनात विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिक सहभागी झाले होते.
भगतसिंग जन अधिकार यात्रेच्या समन्वयक डॉ. पूजा यांनी एसआयआर प्रक्रियेवर टीका केली. या प्रक्रियेमुळे मुस्लिम, दलित, आदिवासी आणि कष्टकरी वर्गातील नागरिक मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची आणि निवडणूक कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. दिशा विद्यार्थी संघटनेचे अविनाश यांनी देशातील विविध भागात आंदोलक, पत्रकार आणि वकिलांना सामोरे जावे लागणाऱ्या कथित दडपशाहीचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राखण्यासाठी व्यापक संघर्षाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनेचे धनंजय यांनी एसआयआरविरोधातील मोहीम महाविद्यालये, विद्यापीठे आणि कष्टकरी वस्त्यांपर्यंत पोहोचवून व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. नौजवान भारत सभेचे सदस्य राहुल यांनी क्रांतिकारक अशफाकउल्ला खान यांच्या वारशाचा उल्लेख करत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाविरोधात एकजूट करण्याचे आवाहन केले.
मुंबईतील कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य साहिल परसेकर यांनीही आंदोलनातील मागण्यांना पाठिंबा दिला. सर्जनशील राजकीय संदेश, रॅप सादरीकरणे, सामूहिक गीते आणि क्रांतिकारी घोषणांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी एसआयआरविरोधातील संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT