मुंबई

पूर्णेकर हत्या प्रकरणातील तिसरा चॉपर दहिसर मोरीत सापडला ;

CD

तिसरा चॉपर दहिसर मोरीत सापडला
पूर्णेकर हत्येतील टल्ली, पपलूला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेला तिसरा चॉपर शुक्रवारी (ता. २३) रात्री ठाणे शहर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) हस्तगत केला. शिळ-डायघर परिसरातील दहिसर मोरी येथील झाडाझुडपांमध्ये हा चॉपर आढळून आला. दरम्यान, अटकेतील संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू यांची पोलिस कोठडी संपल्याने शनिवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी दिली असून, त्यांना तळोजा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर या प्रकरणात आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यापूर्वी कर्नाळा अभयारण्य परिसरातून दोन चॉपर हस्तगत करण्यात आले होते, मात्र हत्येसाठी वापरण्यात आलेले तिसरे चॉपर सापडले नव्हते. अखेर शुक्रवारी (ता. २३) रात्री एसआयटीच्या पथकाने शिळ-डायघर परिसरातील दहिसर मोरी येथील झाडाझुडपांमध्ये शोध घेतला. त्या वेळी पथकाला तिसरा चॉपर सापडला.

दरम्यान, टल्ली आणि पपलू यांना शनिवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल आणि हेल्मेट अद्याप हस्तगत झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या वस्तूंचा शोध घेण्यासाठी आरोपींची आणखी एक दिवस पोलिस कोठडी आवश्यक असल्याची मागणी तपास पथकाने केली, मात्र आरोपींच्या वकिलांनी याला विरोध केला. आरोपींना १३ दिवसांहून अधिक काळ पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, या कालावधीत तपास बराच पुढे गेला आहे. त्यामुळे आणखी पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर दोघांचीही तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

आरोपींच्या वस्तूंचा शोध कायम
तिसरा चॉपर हस्तगत झाल्याने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या तीन धारदार शस्त्रांचा शोध पूर्ण झाला आहे, मात्र आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल आणि हेल्मेट अद्याप मिळालेले नसल्याने या वस्तूंचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर कायम आहे. या वस्तू हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT