मुंबई

पाणी बचतीचा संदेश देत १९ सायकलस्वारांची कल्याण ते दांडेली ९०० किमीची साहसी मोहीम

CD

पाणीबचतीचा संदेश देत १९ सायकलस्वारांची मोहीम
कल्याण ते दांडेली ९०० किलोमीटरचा प्रवास; डॉक्टर, वकील, पोलिसांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : पाणीबचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिसरातील १९ सायकलस्वारांनी कल्याण ते दांडेली अशी ९०० किलोमीटरची साहसी सायकल मोहीम सुरू केली आहे. कल्याणमधील दुर्गाडी चौकातून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे आणि रोटरी क्लब ऑफ कल्याणचे कैलास देशपांडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला. आठवडाभरात हे अंतर पूर्ण करण्याचे सायकलस्वारांचे लक्ष्य आहे.
या मोहिमेत डॉक्टर, वकील, पोलिस कर्मचारी, आयटी व्यावसायिक, रेल्वे अधिकारी, शिक्षक, उद्योजक, भारतीय नौदलातील अधिकारी, दिग्दर्शक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले हे सायकलस्वार सामाजिक बांधिलकी जपत सायकल प्रवासातून पाणीबचतीचा संदेश देणार आहेत.

पश्चिम घाटातून दांडेलीकडे प्रवास
कल्याणहून पुणे, त्यानंतर कऱ्हाड, राधानगरी घाटमार्गे सावंतवाडी आणि गोवा असा प्रवास करत सायकलस्वार दांडेलीकडे रवाना झाले आहेत. पश्चिम घाटातील डोंगररांगा, नागमोडी घाटरस्ते आणि हिरव्यागार वनराईतून होणारा हा प्रवास त्यांच्या शारीरिक क्षमतेची, सहनशक्तीची आणि मानसिक कणखरतेची परीक्षा घेणारा ठरणार आहे. पुढील आठवडाभरात ९०० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मोहिमेतील प्रमुख सायकलस्वार डॉ. रेहनुमा यांनी दिली.

पाणीबचतीचा संदेश
“दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबरच पाणीबचतीसाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हाच संदेश या सायकल मोहिमेतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,” असे सहभागी सायकलस्वार प्रतीक गरवारे यांनी सांगितले.

आठ वर्षांपासून सायकल मोहिमांचे आयोजन
‘टीम बाइकपोर्ट’ गेल्या आठ वर्षांपासून देशातील विविध ठिकाणी वार्षिक सायकल मोहिमांचे आयोजन करत आहे. गोवा, हैदराबाद, दिल्ली, कूर्ग आणि ऊटी येथे सायकल प्रवास केलेल्या या पथकाने यंदा दांडेलीची निवड केली आहे. दरवर्षी एखादा सामाजिक संदेश घेऊन प्रवास करण्याची परंपरा या पथकाने जपली आहे. ही मोहीम केवळ ९०० किलोमीटरचे अंतर पार करण्यापुरती मर्यादित नसून, पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करणे, पर्यावरणाप्रती सामाजिक बांधिलकी जपणे आणि सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा तिचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT