कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : ऑनलाइन गेमिंगसाठी आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) खरेदी करण्याच्या प्रयत्नात नाशिकच्या २२ वर्षीय नील खेतिया या तरुणाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. स्वस्त दरात आभासी चलन खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याला जयपूर येथे बोलावून त्याचे कथित अपहरण करण्यात आले. त्याच्या सुटकेसाठी वडिलांकडे १५ लाख, तर प्रेयसीकडे सात लाखांची खंडणी मागण्यात आली. कल्याण लोहमार्ग पोलिस आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या संयुक्त पथकाने कारवाई करून नीलची हरियाणातून सुटका केली. या प्रकरणी नवीन आणि मंगला या दोघांना अटक करून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलला ऑनलाइन गेमिंगमधील फीचर्स खरेदी करण्यासाठी यूएसडीटी क्रिप्टोकरन्सीची गरज होती. गुजरातमधील एका मित्राने त्याला प्रतियुनिट ९६.५० रुपयांच्या दराने युएसडीटी मिळू शकत असल्याची माहिती दिली. बाजारात त्याचा दर ९७ ते ९७.५० रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. यातून ५० पैसे ते एक रुपया नफा मिळवण्याच्या उद्देशाने नीलने ऑनलाइन संपर्क साधला. याच दरम्यान काही जणांनी त्याला व्यवहारासाठी जयपूर येथे बोलावले. तेथे त्याचे कथित अपहरण करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.