मुंबई

‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ उपक्रमाचे सहा महिन्यांत सकारात्मक परिणाम

CD

एड्स नियंत्रणात राज्यात सहा जिल्हे ‘सुरक्षित’
सुरक्षा उपक्रमाचे सकारात्मक परिणाम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : एचआयव्ही संसर्गाच्या प्रतिबंधासह निदान आणि उपचार सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ उपक्रमातून महाराष्ट्राने सहा महिन्यांत महत्त्वाची प्रगती केली आहे.
राज्यातील धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि सांगली या सहा जिल्ह्यांनी एचआयव्ही नियंत्रणाची तिन्ही उद्दिष्टे साध्य करीत ‘सुरक्षित’ श्रेणीत प्रवेश केला आहे. तर, २३ जिल्ह्यांनी दोन उद्दिष्टे पूर्ण करून ‘सक्षम’ श्रेणी गाठली आहे. आता १ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती करण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी सर्व आरोग्य यंत्रणा अधिक सक्रियपणे काम करीत असून, सर्व जिल्ह्यांनी उद्दिष्टे साध्य करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. नॅको म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर हा उपक्रम झाला असून, महाराष्ट्रात ७ एप्रिल २०२६ रोजी त्याची सुरुवात झाली. त्यापूर्वी राज्यातील केवळ एक जिल्हा ‘सक्षम’, तर ३५ जिल्हे ‘संघर्षशील’ श्रेणीत होते. सहा महिन्यांत झालेली ही प्रगती एचआयव्ही नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.
...
काय आहेत ९५:९५:९५ उद्दिष्टे?
एचआयव्हीसह जगणाऱ्या ९५ टक्के व्यक्तींना त्यांच्या संसर्गाची माहिती असणे, निदान झालेल्यांपैकी ९५ टक्के व्यक्तींनी अँटिरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) घेणे आणि उपचार घेणाऱ्यांपैकी ९५ टक्के व्यक्तींचा विषाणुभार नियंत्रणात आणणे, ही तीन उद्दिष्टे आहेत. तिन्ही उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्याला ‘सुरक्षित’, तर कोणतीही दोन उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्याला ‘सक्षम’ श्रेणी दिली जाते. याशिवाय एचआयव्ही, सिफिलिस आणि हिपॅटायटिस-बीचा मातेकडून बालकाकडे होणारा प्रसार शून्यावर आणणाऱ्या जिल्ह्यास ‘सुरक्षित+’ श्रेणी दिली जाते.
...
सरकारने एचआयव्हीचे लवकर निदान, वेळेत उपचार आणि सातत्यपूर्ण काळजी सेवांच्या माध्यमातून १ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांनी ९५:९५:९५ उद्दिष्टे साध्य करण्याचा निर्धार केला आहे.
- प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT