मुंबई

मुंबईत ५६४ लिटर दूध नष्ट

CD

मुंबईत ५६४ लिटर दूध नष्ट
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात आस्थापनांचे परवाने, नोंदणी निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून ५६४ लिटर दूध नष्ट केले आहे. गोवंडी, मानखुर्द, अँटॉप हिल, चेंबूर, धारावी परिसरात २३, २४ ऑक्टोबरला केलेल्या कारवाईत दूधविक्री केंद्रांमधील अनियमितता उघड झाली. या मोहिमेत सात आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या डेअरीविरोधातही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सुट्या दुधाच्या विक्रीवर कारवाई
गोवंडीतील साईनाथ डेअरी अँड फरसाण मार्टमधून ४५ लिटर, तर मानखुर्दमधील महाराणा डेअरीमधून ४० लिटर संशयास्पद सुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून दुधाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले. स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. मानखुर्दमधील अगस्ती मिल्क एजन्सीचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोवंडी पूर्वेतील यादव डेअरी विनापरवाना सुरू असल्याचे आढळले.

साठवणुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष
अँटॉप हिल येथील सागर मिल्क सेंटरमध्ये दुधाची साठवणूक आणि विक्री प्लॅस्टिकच्या पिशव्या व कॅन्समधून होत असल्याचे आढळले. साठवणुकीच्या अटींचे उल्लंघन झाल्याने २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. त्याची किंमत ११ हजार ६२५ रुपये आहे. धारावीतील शक्ती डेअरीमधून ३१ लिटर, तर माहीम पश्चिमेतील राहुल मिल्क सेंटरमधून १९८ लिटर कच्चे सुटे गायीचे दूध नष्ट करण्यात आले.

सात आस्थापनांवर कारवाई
अस्वच्छ स्वयंपाकघर, ड्रेनेजची खराब स्थिती, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची एकत्रित साठवणूक, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर आणि कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव अशा त्रुटींमुळे मुंबईतील सात आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी एफडीएच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT