मुंबई

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ

CD

पनवेलकरांचा १६ हजार किलो फराळ सीमेवर
भारत विकास परिषदेचा सातवा कृतज्ञ उपक्रम

नवीन पनवेल, ता. २५ (बातमीदार) : देशभरात दिवाळीचा उत्साह असताना सीमेवर तैनात असलेले जवान मात्र देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असतात. या जवानांची दिवाळीही गोड व्हावी आणि त्यांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी पनवेलमधील भारत विकास परिषदेने पुढाकार घेतला आहे. परिषदेच्या वतीने यंदा तब्बल १६ हजार किलो फराळ सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्याची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष असून, लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमातून जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

लाडू, चकली, शेव, चिवडा आणि शंकरपाळी अशा पारंपरिक दिवाळीच्या पदार्थांचा या फराळात समावेश आहे. जुलै महिन्यापासूनच या उपक्रमाच्या तयारीला सुरुवात करण्यात आली होती. प्रत्येक जवानासाठी स्वतंत्र बॉक्स तयार करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वीच हा फराळ सीमेवर पोहोचविण्याचे नियोजन परिषदेने केले आहे.

लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-काश्मीर, पुंछ तसेच राजस्थानमधील बाडमेर आणि जैसलमेर या सीमावर्ती भागांतील जवानांपर्यंत फराळ पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागांत प्रतिकूल परिस्थितीत तैनात असलेल्या जवानांनाही घरच्या दिवाळीची आठवण करून देणारा हा उपक्रम ठरत आहे.

दिवाळीच्या सणात प्रत्येक घरात फराळाचा आस्वाद घेतला जातो. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना अनेकदा कुटुंबीयांपासून दूर राहून सण साजरा करावा लागतो. अशा वेळी पनवेलकरांनी पाठविलेला फराळ त्यांच्या दिवाळीत गोडवा आणण्याबरोबरच देशवासीयांचे प्रेम आणि आपुलकीची जाणीव करून देणारा ठरणार आहे. लोकसहभागातून सलग सात वर्षे सुरू असलेला हा उपक्रम जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक विशेष प्रयत्न आहे.

लोकसहभागातून साकारला उपक्रम
एवढ्या मोठ्या प्रमाणावर फराळ तयार करणे आणि त्याचे पॅकिंग करणे हे केवळ संस्थेच्या प्रयत्नांतून शक्य नसते. त्यामुळे या उपक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले आहेत. यंदा तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आर्थिक मदत करणे शक्य नसलेल्या नागरिकांनी फराळाचे बॉक्स पॅक करण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे आर्थिक योगदानाबरोबरच वेळ आणि श्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांना जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. भारत विकास परिषदेचे नितीन कानिटकर यांनी या उपक्रमाच्या सात वर्षांतील अनुभव सांगितले. फराळाचे बॉक्स जवानांपर्यंत पोहोचल्यानंतर अनेक जवान बॉक्सवरील क्रमांकाच्या माध्यमातून तसेच ई-मेलद्वारे संस्थेशी संपर्क साधून आपल्या भावना व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT