सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मध्य रेल्वेचे कर्मचारी असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र बाळगण्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ट्रेन मॅनेजर आणि तिकीट तपासनीस यांच्या सतर्कतेमुळे दोघांना पकडून ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांत ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना २३ ऑक्टोबरला सीएसएमटी-डोंबिवली एसी लोकलमध्ये घडली. ट्रेन मॅनेजर जयंत गांगुर्डे यांच्या केबिनमध्ये संदेश तिवारी (वय ४२) हा व्यक्ती बसला होता. आपण रेल्वेतील टीसी असल्याचे सांगून त्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे निरीक्षक (आरोग्य व मलेरिया) पदाचे ओळखपत्र दाखविले, मात्र ओळखपत्र संशयास्पद वाटल्याने गांगुर्डे यांनी ठाणे स्थानकात एमएसएफ जवानाच्या मदतीने त्याला ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनी ठाणे रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
दुसरी घटना २२ ऑक्टोबरला दादर-अंबरनाथ फास्ट एसी लोकलमध्ये घडली. टीटीआय झुबेर देसाई तिकीट तपासत असताना पीटर अहरोम यादव (वय ४३) याने वरिष्ठ अभियंता असल्याचे ओळखपत्र दाखविले. संशय आल्याने देसाई यांनी त्याला ठाणे स्थानकात उतरवून चौकशी केली. त्याने बनावट ओळखपत्र तयार केल्याची कबुली दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.