मुंबई

ठाण्यात मराठी साहित्य-कला अकादमी भवन उभारावे

CD

ठाणे, ता. २५ (बातमीदार) : मराठी भाषा, साहित्य आणि कवितेच्या माध्यमातून अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांचा अमृत महोत्सव शनिवारी (ता. २४) ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी ठाणे शहरात स्वतंत्र मराठी साहित्य-कला अकादमी भवन उभारण्याची अपेक्षा व्यक्त करत, हे भवन प्रत्यक्षात साकारलेले आपल्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अशोक बागवे अमृत महोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, खासदार नरेश म्हस्के, दिग्दर्शक अभिजित पानसे, प्रा. प्रदीप ढवळ, सुधीर घागस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. बागवे यांच्या कवितांच्या अभिवाचनाने झाली. या वेळी त्यांच्या गौरवग्रंथासह त्यांनी लिहिलेल्या १२ पुस्तकांचे आणि त्यांच्या २० कवितांच्या रसग्रहणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘अस्वस्थ अनावर’ या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचेही प्रकाशन झाले.

मराठी साहित्याचे पोळे निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व
बागवे यांनी सिनेमा, मालिका आणि कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी साहित्याविषयी प्रेम निर्माण केले. मराठी साहित्याचे पोळे बागवे यांनी निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार काढत शेलार यांनी ‘गठबंधन’ आणि ‘कर्म’ या त्यांच्या कवितांचे अभिवाचनही केले.

कविता म्हणजे समाजातील संवेदनशीलता, अनुभव
खासदार नरेश म्हस्के यांनी बागवे हे आपले प्राध्यापक असल्याचे सांगत, त्यांच्यामुळे मराठी भाषेचे संस्कार झाल्याची भावना व्यक्त केली. कविता म्हणजे केवळ यमक जुळवलेले शब्द नसून समाजातील संवेदनशीलता आणि अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम आहे, हे बागवे यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

कलावंत रसिकांमुळेच मोठा होतो
आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. बागवे यांनी रसिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. रसिक आहेत म्हणून कलावंत आहेत, ही भावना व्यक्त करत त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याविषयीचे ऋण फेडण्यासाठी अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. ठाण्यात गडकरी रंगायतनसारखे नाट्यगृह असले, तरी नव्या पिढीला नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी पुरेशा जागा उपलब्ध होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ठाण्यात मराठी साहित्य-कला अकादमी भवन उभारल्यास साहित्य आणि कलाक्षेत्राला मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT