ब्लू फ्लॅग प्रकल्पाबाबत पोलिसांना निवेदन
श्रीवर्धन, ता. २६ (वार्ताहर) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या ब्लू फ्लॅग प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर होणाऱ्या वैयक्तिक व बदनामीकारक टीकेची दखल घ्यावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुची बोरकर यांनी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात निवेदन देऊन मांडली आहे. स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करत पर्यटन विकासाला चालना द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रक्रियेत स्थानिक नागरिक, छोटे व्यावसायिक आणि विशेषतः महिला स्टॉलधारकांच्या उपजीविकेचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे बोरकर यांनी नमूद केले.
मेटकर्णी येथील महिला स्टॉलधारकांवरील कारवाईप्रकरणी वन विभागाची प्रशासकीय प्रक्रिया आणि कायदेशीर बाजू समजून न घेता मंत्री आदिती तटकरे यांना थेट जबाबदार धरणे व त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिकांच्या प्रश्नांवर नियमानुसार तोडगा काढून महिला स्टॉलधारकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनावेळी पदाधिकारी उपस्थित
या वेळी उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकल्पाबाबत गैरसमज दूर करून स्थानिकांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
(फोटो : पोलिस निरीक्षकांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.