मुंबई

सात दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा रास्ता रोको!

CD

पनवेलमध्ये रस्त्यांची दुरवस्था
शिवसेनेकडून रास्ता रोकोचा इशारा

पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील प्रमुख आणि ग्रामीण रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत व झुडपांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पनवेल-माथेरान, नेरे-धोदाणी-मालडुंगे, चिपळे-मोरबे आणि वाकडी-दुंदरे या मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे पनवेल तालुका उपप्रमुख विश्वास पाटील, तालुका संघटक दिनेश मांडवकर आणि नेरे विभागप्रमुख विद्याधर चोरघे यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. संबंधित रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना अपघाताचा धोका पत्करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

नेरे ते वाकडी-दुंदरे मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसण्यात अडथळे निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गांवरील खड्डे बुजवण्यासह गवत आणि झुडपांची छाटणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सात दिवसांची मुदत

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सात दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्वास पाटील, दिनेश मांडवकर आणि विद्याधर चोरघे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT