मुंबई

मोठ्या टीव्हीत ‘हायसेन्स’चे अव्वल स्थानाचे लक्ष्य : पंकज राणा

CD

मुंबई, ता. २५ : १०० इंचांपेक्षा जास्त मोठ्या टीव्हीमध्ये आम्ही जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. आता बिग स्क्रीन टीव्ही म्हणजे ७५ इंच पेक्षा जास्त मोठ्या टीव्हीमध्ये आम्हाला भारताचा पहिल्या क्रमांकाचा ब्रॅँड व्हायचे आहे, असे ‘हायसेन्स इंडिया’चे सीईओ पंकज राणा यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कोहिनूर इलेक्ट्रॉनिक रिटेल ब्रांचच्या सहकार्याने आरजीबी गटातील १०० इंची मिनी एलजीडी प्रकारचा मोठा टीव्ही विक्रीसाठी आणला. आमच्याकडे ११६ इंचाचा आरजीबी टीव्ही आहे. हा जगातील सर्वात मोठा मिनी आरजीबी गटातील टीव्ही आहे. याच्या आवाजाचा दर्जा, स्क्रीनवरील चित्राची गुणवत्ता हे सारे चांगले आहे, असे ते म्हणाले.

आम्ही १०० इंचांपेक्षा जास्त मोठ्या टीव्हीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्यातील निम्मा बाजारवाटा आमच्याकडे आहे. आम्ही फक्त टीव्ही बनवणारी कंपनी नसून पुढील महिन्यात फ्रंट लोड वॉशिंग मशीनही भारतात आणू. आम्ही सर्वश्रेणीचे एसी भारतात विकत आहोत. आम्ही तीन वेळा फिफा वर्ल्ड कप फुटबॉल पुरस्कर्ते होतो. तर युरो कपचे ही अनेक वर्षे पुरस्कर्ते होतो. त्यामुळे भारतात ग्राहक जोडण्यास मदत झाली, असेही ते म्हणाले.

भारतातील आमची वार्षिक उलाढाल बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांची आहे. यापुढे आमचे विक्री पथक देशात विक्री वाढवेल. तसेच वितरण जाळेही आम्ही वाढवत आहोत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कोहिनूरचे संचालक संजय मेवाणी तसेच अभिनेत्री निया शर्मा हजर होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT