मुंबई

‘इंडिया ज्वेलरी पार्क’मुळे महाराष्ट्र दागिने उत्पादनाचे केंद्र

CD

ज्वेलरी पार्कमुळे गुंतवणुकीला चालना
एक लाख रोजगाराच्या उपलब्धतेचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : नवी मुंबईतील महापे येथे उभारण्यात येणाऱ्या ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर रत्न आणि आभूषण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख मिळेल. या प्रकल्पातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील २२ एकर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांमुळे राज्याला जागतिक रत्न व आभूषण क्षेत्रात मोठी झेप घेण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘‘बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त सहभागातून उभा राहत असलेला हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू ठरेल. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांतील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे.’’ असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत तसेच भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी आणि उपाध्यक्ष शौनक पारिख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला बळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळे राज्यातील रत्न व आभूषण उद्योगाला मोठे बळ मिळेल, असे सांगितले. ‘‘देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. राज्याच्या नवीन जेम्स अँड ज्वेलरी धोरणातून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. महापे येथील ज्वेलरी पार्कमध्ये दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याची क्षमता असेल. तसेच, येथे कामगारांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT