मुंबई

सायन पूल सुरू होताच धारावीतील अंतर्गत रस्ते मोकळे

CD

सायन पूल सुरू होताच धारावीतील अंतर्गत रस्ते मोकळे
वाहतूक कोंडीचा ताण घटला; रुग्णवाहिका, विद्यार्थी, स्थानिकांना दिलासा
धारावी, ता. २६ (बातमीदार) : सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने धारावीतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. गेल्या २७ महिन्यांपासून पूल बंद असल्याने धारावीतील प्रमुख रस्त्यांवरून वळविण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती, मात्र २२ ऑक्टोबरपासून पूल पुन्हा सुरू झाल्याने धारावीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकासमोरील ११२ वर्षे जुना वाहतूक पूल पुनर्बांधणीसाठी १ ऑगस्ट २०२४ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे पुलावरील वाहतूक सायन रुग्णालयासमोरील सुलोचना शेट्टी मार्गावरील पुलावरून धारावीकडे वळविण्यात आली होती. परिणामी, ६० फुटी संत कबीर मार्ग, ९० फुटी कृष्णन मेनन मार्ग, संत रोहिदास मार्ग, धारावी मुख्य रस्ता, संत कक्कया मार्ग आणि धारावी क्रॉस रोड या अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती. बेस्टच्या बससह जड आणि हलक्या वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

रुग्णवाहिकांचा अडथळा दूर
धारावीतील ६० फुटी रस्ता पश्चिम उपनगरातून सायन रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय आणि महात्मा गांधी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे, मात्र अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकाही अनेकदा अडकून पडत होत्या. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवताना अडचणी येत होत्या. आता सायन पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.

विद्यार्थ्यांचीही सुटका
धारावीतून सायन, चेंबूर आणि दादरच्या दिशेने जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. पूल बंद असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. स्कूल बस, खासगी वाहने आणि दुचाकींच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पूल सुरू झाल्याने या समस्येतूनही सुटका झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT