मुंबई, ता. २६ : लवकरच प्रॉपर्टी कार्डवर सोसायट्यांचे नाव थर्ड पार्टी म्हणून लागणार आहे. त्याचप्रमाणे विक्रोळी मागोमाग गोरेगाव येथेही हाउसिंग विभाग सुरू होईल. मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला आहे, त्यांच्या आणि सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तसुभरही तडा देणार नाही, अशी ग्वाही मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात रविवारी (ता. २५) सहकार पॅनेलतर्फे मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहीर मेळाव्यात दरेकर बोलत होते.
मुंबई बँक, मुंबई हाउसिंग फेडरेशन, मुंबई सहकार बोर्ड, राज्य सहकारी संघ असोसिएशन ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर शब्दाचा मान ठेवून लोकांना पाठवलात त्यांनी जनतेला न्याय देण्याचे काम केल्याचेही दरेकरांनी म्हटले.
दरेकर म्हणाले, बदलत्या परिस्थितीत लोकांना आणखी दिले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत, हे समजून आम्ही कामाची गती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाउसिंग सेक्टरची क्षमता, प्रश्न समजून घेतले आणि कधी नव्हे एवढे महत्त्व हाउसिंग सेक्टरला दिले होते. विक्रोळी येथे हाउसिंग सेक्टर सुरू झाले असून, सर्व व्यवस्था तेथे आहेत. येणाऱ्या काळात गोरेगाव येथेही हाउसिंग सेक्टर सुरू होईल. आता प्रॉपर्टी कार्डवर हाउसिंग सोसायटीचे थर्ड पार्टी म्हणून नावे येणार आहे.
सायन येथे सहकार भवन
मुंबईत येत्या दीड वर्षात सहकारी कार्यकर्त्यांसाठी सायन येथे सहकार भवन उभारत आहोत. सर्व सुविधांनी युक्त हे सहकार भवन असेल.
मुंबई : सहकारी संस्थांच्या मेळाव्यात आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थितांना संबाेधित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.