मुंबई

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी जिल्हाधिकारी करंजाडेत

CD

करंजाडेच्या गावठाणाचा तिढा सुटणार?

जिल्हाधिकाऱ्यांकडून चर्चेचे आश्वासन

पनवेल, ता. २६ (बातमीदार) : करंजाडे गावठाण आणि विस्तारित गावठाणासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सविस्तर चर्चा होणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गावठाणाच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच करंजाडे येथे भेट दिली. या वेळी सरपंच मंगेश शेलार यांनी गावठाण आणि विस्तारित गावठाणासंदर्भातील प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गावाची भौगोलिक परिस्थिती, गावठाणाची सद्य:स्थिती आणि विस्तारित गावठाणाशी संबंधित विविध बाबींची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

गावठाण आणि विस्तारित गावठाणाचे प्रश्न स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्यावर प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी जावळे यांनी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

या आगामी बैठकीत गावठाण आणि विस्तारित गावठाणाच्या प्रश्नांवर कोणती भूमिका घेतली जाते तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे करंजाडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या करंजाडे भेटीदरम्यान सरपंच मंगेश शेलार आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Pune Crime : बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT