मुंबई

३६ तासांची पाणीकपात ५५ तासांवर

CD

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : शहरात पाणीकपात ३६ तासांची जाहीर करण्यात आली होती, मात्र काही परिसरात नागरिकांच्या नळाला तब्बल ५५ तासांनंतर पाणी आल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना अतिरिक्त १९ तास पाण्याविना काढावे लागले. आधीच पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापात भर पडली असून, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य सरकारच्या दहा टक्के पाणीकपातीच्या निर्णयानुसार उल्हासनगरातील कॅम्प तीन, चार आणि पाचमध्ये दर आठवड्याला ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे पालिकेने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात काही परिसरात तब्बल ५५ तासांनंतर नागरिकांच्या नळाला पाणी आल्याने पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. नियोजित वेळेपेक्षा अतिरिक्त १९ तास पाणीपुरवठा बंद राहिल्याने अनेक घरांतील साठवलेले पाणी संपले. त्यामुळे गृहिणी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांची पाण्यासाठी मोठी धावपळ उडाली.

अवघ्या ३६ तासांची पाणीकपात ५५ तासांवर कशी पोहोचली, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. दर आठवड्याला अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

GIFT City Investment: ‘गिफ्ट सिटी’ : गुंतवणुकीचा नवा मार्ग

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT