मुंबई

पाणीटंचाईचा लोकप्रतिनिधींवर रोष

CD

भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) : एल-निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातसुद्धा १० टक्के पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु भिवंडी शहरात पाणी वितरण व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे वर्षभर काही भागात मुबलक, तर काही भागात तुरळक पुरवठा होत आहे. यामुळे आता लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

महिलांच्या पाणीसमस्या एकूण घेण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांना प्रभाग समिती क्रमांक पाचमधील सभापती ॲड. वैभव भोईर, नगरसेविका रोमा आळशी, समाजसेवक अशोक जैन यांनी नझराणा कंपाऊंड येथे नुकतेच बोलावले होते. या वेळी महिलांनी संताप व्यक्त करीत राजकारण बाजूला ठेवून पाणी दररोज नियमित मिळाले पाहिजे, ही मागणी लावून धरली. परंतु त्यानंतरही पाणी येत नसल्याने पहाटे तीन वाजता महापौर चौधरी हे स्वतः त्या परिसरात उपस्थित असताना दीड तास मिळणारे पाणी १५ मिनिटांमध्ये बंद झाल्याचे वास्तव समोर आले. त्यानंतर महापौर अवाक होऊन उपस्थित पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांच्यासमोर संताप व्यक्त करीत पाणी नक्की जाते कुठे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला.

आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर सात ते आठ महिन्यांपासून या भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. नागरिक लोकप्रतिधी म्हणून आमच्यावर संताप व्यक्त करतात, पण ठेकेदारामार्फत नियुक्त वॉलमनच्या मनमर्जीमुळे पाणी वितरण कोलमडले आहे.
- रोमा नीलेश आळशी, नगरसेविका

टंचाईची समस्या गंभीर बनलेली असताना पाणीपुरवठा विभाग शहरातील गळती व चोरी रोखण्यात अयशस्वी ठरल्याने शहरातील अनेक भागात पाणी मिळत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गांभीर्याने पाणी चोरांवर कठोर कारवाईचे निर्देश देवून पाणीसंकट दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अन्यथा टंचाईविरोधात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल.
- अशोक जैन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Supreme Court SIR hearing: ''विरोधकांच्या याचिका केवळ एका बातमीवर आधारलेल्या'', SIR प्रकरणी निवडणूक आयोगाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

Maharashtra Live News: शेतकऱ्यांनी उसावर फिरवला नांगर

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

SCROLL FOR NEXT