मुंबई

खान कंपाउंडमधील रहिवाशांना रेल्वेची नोटीस

CD

कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण पश्चिमेतील नेहरूनगर परिसरातील सिंडिकेट गेटजवळ असलेल्या आतिश खान कंपाउंडमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरातील ४६ रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७० वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जागा रिकामी करण्यापूर्वी पर्यायी घरे द्यावीत किंवा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

आतिश खान कंपाउंडमधील अनेक कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या या परिसरात राहत आहेत. स्थानिक रहिवासी जना शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जन्म आणि विवाह याच परिसरात झाला असून, त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आजी-आजोबांच्या काळापासून येथे आहे. १९९६ मध्ये घरांवर तोडक कारवाई झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. २०२३ मध्ये न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागल्याचे जना शेख यांनी सांगितले, मात्र २०२५ पासून पुन्हा नोटिसा येऊ लागल्या असून, आता घरे रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने रहिवाशांनी पुनर्वसनाची मागणी पुढे केली आहे. याप्रकरणी रहिवाशांनी शिवसेना (शिंदे गट) कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांची भेट घेऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या प्रश्नाची माहिती देत तोडगा काढण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT