मुरबाड, ता. २७ (बातमीदार) : पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट मिळाल्यानंतर कंत्राटदाराने ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनामत रक्कम म्हणून ६४ लाखांची मुदत ठेव पावती सादर केली होती. ही पावती बनावट असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी चौकशी करून सत्यता आढळल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसेच कंत्राटदाराने भरलेली ४४ लाख ५५ हजारांची सुरक्षा रक्कम जप्त करण्यात यावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंत्यांनी ठाणे बांधकाम विभाग १ चे कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
भिवंडी तालुक्यातील कुंदे वडाचा पाडा येथे पुलाचे बांधकाम करण्याचे एका ठेकेदाराला काम मिळाले होते. त्यांनी कंत्राटाची अनामत रक्कम म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाडा शाखेकडील ६४ लाखांची मुदत ठेव पावती सादर केली होती, परंतु ही पावती स्टेट बँक या शाखेशी संबंधित नसल्याची माहिती बँकेने माहितीच्या अधिकारात देशमुख यांना दिलेल्या माहितीमध्ये नमूद केली आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश अधीक्षक अभियंत्यांनी काढला आहे. कल्याण येथील दिनेश शंकरराव देशमुख यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणातील मुदत ठेव पावती खरी नसल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया वाडा शाखा यांनी देशमुख यांना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.