मुंबई

मनसेच्या गटनेते कार्यालयावर भाजपचा आक्षेप

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि मनसेतील राजकीय संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र लिहून मनसेला गटनेतेपद आणि पालिका मुख्यालयात स्वतंत्र कार्यालय देण्याच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.

पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयातून मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या घटनेनंतर भाजपने आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांना मनसेची साथ सोडण्याचा सल्ला दिला होता. या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय तणावही वाढला होता. भाजपने मनपातील युती तोडण्याची भूमिका मांडली होती. मात्र, शिवसेनेने मनसेची साथ सोडली नाही.

अलीकडेच पालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेचा एक सभापती निवडून येण्यात भाजपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, या निवडीनंतर अवघ्या दोन दिवसांतच भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनी आयुक्तांना पत्र लिहून मनसेला गटनेतेपद आणि स्वतंत्र कार्यालय देण्याबाबत जाब विचारला आहे. मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे शिव विकास आघाडीत सहभागी झाल्याचे पत्र दिले असताना, पालिकेत मनसेला स्वतंत्र गटनेतेपद आणि कार्यालय कोणत्या नियमांतर्गत देण्यात आले, असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT