मुंबई

निर्मल यूथ फाउंडेशनतर्फे स्वयंसेवकांचा सन्मान

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : सण-उत्सवांच्या काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या निर्मल यूथ फाउंडेशनतर्फे निर्माल्य संकलन व वर्गीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या ३०० हून अधिक स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र वितरण आणि स्वयंसेवक सन्मान सोहळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. या मोहिमेत स्वयंसेवकांनी तब्बल २९ टन निर्माल्य संकलित केले.

पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून शाश्वत विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या काळात विविध विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांनी उपस्थित राहून निर्माल्य संकलन केले. फुले, पाने आणि अन्य सेंद्रिय कचरा जलस्रोतांमध्ये मिसळू नये, यासाठी जनजागृतीही करण्यात आली. संकलित निर्माल्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि त्यापासून खतनिर्मितीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर संस्थेने भर दिला. या सोहळ्यात निर्माल्य संकलन मोहिमेसह वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचाही गौरव करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि निर्मल यूथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सुजाण प्रकल्प ०.१’ अंतर्गत सुका कचरा संकलन, वर्गीकरण आणि जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रगती महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, द साऊथ इंडियन असोसिएशन, मंजुनाथ आणि गार्डियन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ विजय घोडेकर, इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्चचे अध्यक्ष राजीव ताईशेटे, डॉ. जोया पाटील, तुषार गांगुर्डे, गगन गौतम शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा अक्षता औटी, उपाध्यक्षा विनिता चाहेर आणि सदस्य सुशांत वसावे व अविनाश कोटीएन यांनीही उपक्रमात सहभाग घेतला.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT