मुंबई

रहिवाशांच्या इच्छेविरुद्ध क्लस्टर होणार नाही

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : गेल्या १७ वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्तकनगर येथील शिवाई नगरमधील म्हाडाच्या ६९ सोसायट्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली ले-आऊट मंजुरी रखडल्याने रहिवाशांची कोंडी झाली असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. ले-आऊट मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल आणि रहिवाशांच्या इच्छेविरुद्ध क्लस्टर योजना लादू दिली जाणार नाही, असे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले.

शिवाई नगरमधील पुनर्विकासाच्या प्रश्नावर रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी नगरसेवक सिताराम राणे यांनी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, म्हाडाची भूमिका आणि क्लस्टर योजनेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांवर चर्चा झाली. पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ले-आऊट मंजुरी महत्त्वाची असल्याचे सांगत केळकर यांनी म्हाडा प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांकडे हा विषय मांडल्याचे स्पष्ट केले. प्रशासकीय पातळीवर चर्चा करून प्रश्न सुटत नसल्यास संघर्षाची भूमिका घेण्याचीही तयारी आहे. मंजुरी मिळेपर्यंत रहिवाशांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

शिवाई नगरमधील ६९ सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक सिताराम राणे यांनी सांगितले. यातील सुमारे ३७ ते ३८ सोसायट्यांना ‘हिरानंदानी’कडून पुनर्विकासासाठी ऑफर लेटर मिळाले आहे. मात्र, ले-आऊट मंजूर नसल्याने पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे सरकू शकलेली नाही.

महसूलमंत्र्यांकडे पाठपुरावा
शिवाई नगरच्या ले-आऊटसाठी आवश्यक असलेली बिगरशेती (एनए) प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही मंजुरीच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एनए कर, लीज आणि म्हाडाकडून निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याचे केळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

Piyush Goyal : समुद्राला बांध घालणाऱ्या डचांसमोर गोयलांनी मांडला 'भारत' नावाचा ब्रँड

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

SCROLL FOR NEXT