दोन भावांनी स्वखर्चाने बांधला बंधारा
खैरे खुर्दमधील उपक्रम; पाणीटंचाईवर मात करण्यास मदत
रोहा, ता. २६ (बातमीदार) : पावसाने ओढ दिल्याने रोहा तालुक्यातील खैरे खुर्द परिसरात आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी गावातील शेतकरी फरहान फारुक धनसे आणि फिरोज फारुक धनसे या दोन सख्ख्या भावांनी तळवडे-खैरे खुर्द नदीवर स्वखर्चाने बंधारा बांधला आहे. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिना संपताच नदीतील पाणी पुढील खाडीत वाहून जाते. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडून परिसरातील शेतकरी आणि पशुधनाला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन फरहान आणि फिरोज या दोघांनी बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वखर्चाने हे काम पूर्ण केले.
पाण्याची समस्या वेळीच ओळखून केलेल्या या प्रयत्नामुळे नदीतील पाणी अडवून त्याचा उपयोग करण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाईच्या काळात शेतकरी आणि जनावरांना दिलासा मिळावा, या उद्देशाने उभारलेल्या बंधाऱ्याच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
जलसंधारणाचा कृतीतून संदेश
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत फरहान आणि फिरोज धनसे यांनी गावापुढे आदर्श ठेवला आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून स्थानिक पातळीवर केलेल्या या प्रयत्नामुळे जलसंधारणाची गरज अधोरेखित झाली आहे.
फोटो कॅप्शन : रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथे तळवडे-खैरे खुर्द नदीवर बंधारा उभारण्याचे काम सुरू असताना शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.