मुंबई

मुरूडला दुष्काळग्रस्त घोषित करा

CD

मुरूडला दुष्काळग्रस्त घोषित करा
भातशेती, फळबागांच्या नुकसानीनंतर विघ्नेश माळी यांची मागणी
मुरूड, ता. २६ (बातमीदार) : यंदा अत्यल्प व अनियमित पावसामुळे मुरूड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, सुपारीच्या फळगळतीमुळे बागायतदारही अडचणीत आले आहेत. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांनी तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करताना शिवसेनेचे जिल्हा सहप्रमुख भरत बेलोसे, मुरूड तालुका संघटक यशवंत पाटील, पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य गणेश नाक्ती, मनोज कमाने, ऋषिकांत डोंगरीकर, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.
निवेदनात मुरूडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे, भातपिकांसह फळबागांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, शेतीपम्पांचे वीजबिल आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते माफ करणे किंवा त्यांना स्थगिती देणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि संभाव्य तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

महसूल विभागाचा नुकसान अहवाल शासनाकडे
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार आदेश डफळ यांनी महसूल विभागाच्या पाहणीत मुरूड तालुक्यातील भातशेतीचे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे सांगितले. पाणीटंचाईसह अन्य समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांचा सत्तापक्षाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT