मुंबई

दिवाळीत साखरेचे दर स्थिर; ग्राहकांना दिलासा

CD

दिवाळीत साखरेचे भाव स्थिर
ग्राहकांना दिलासा; घाऊक बाजारात किलोमागे ४९ ते ५१ रुपये भाव
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : दिवाळी सणासाठी फराळ आणि मिठाईसाठी साखरेला मोठी मागणी असते. या काळात साखरेचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असते, मात्र यंदा वाशीच्या घाऊक बाजारात साखरेचे भाव स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा पुरेसा आणि सुरळीत असल्याने दिवाळीत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
साखरेच्या भावात यापूर्वी झालेल्या मोठ्या चढ-उतारांचा फटका ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही बसला होता. साधारणपणे किलोमागे ४० रुपयांच्या आसपास असलेले भाव काही महिन्यांपूर्वी ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर भावात घसरण होऊन सध्या बाजारातील परिस्थिती तुलनेने स्थिर झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशीच्या घाऊक बाजारातील साखरेची आवक सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढत असली, तरी बाजारातील आवक आणि पुरवठा लक्षात घेता भाव स्थिर आहेत. दिवाळीपर्यंत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे शुगर मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे.

भावाचे गणित आणि बाजारातील स्थिती :
घाऊक भाव : ४९ ते ५१ रुपये प्रतिकिलो (किंवा ५,२५० रुपये प्रतिक्विंटल)
किरकोळ भाव : ५९ ते ६० रुपये प्रतिकिलो.
घाऊक व किरकोळ भावातील फरक : वाहतूक, पॅकिंग व स्थानिक व्यापाऱ्यांचा खर्चामुळे दोन्ही बाजारातील भावामध्ये किलोमागे सुमारे ८ ते ११ रुपयांचा फरक दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT