मुंबई

मुंबईतील बांधकामांना चाप

CD

मुंबईतील बांधकामांना चाप
प्रदूषणमुक्तीसाठी आशीष शेलारांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रणासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवण्यात यावीत, अशी सूचना मुंबई उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे. हिवाळ्यात वायुप्रदूषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सूचित केले आहे.
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे, असे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वायुप्रदूषणाविरोधातील या लढ्यात नागरिक, संघटना युवक आणि उद्योग क्षेत्र या सर्वांना सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कचरा जाळणे, कचरा डेपोतील आगी आणि बांधकामाचा राडारोडा बेकायदा टाकण्याच्या घटनांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन व समाजमाध्यम खाते सुरू करावे तसेच तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.
...
वाहन प्रदूषण
मुंबई वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समन्वयातून धूर सोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची तपासणी वाढवावी आणि वैध प्रमाणपत्र नसलेल्या अवजड वाहनांना मुंबई महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, असेही आशीष शेलार यांनी सुचविले आहे.
...
उद्योगांनी हरित इंधनाचा वापर करावा
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटच्या अहवालानुसार, या प्रदेशातील उद्योग ऊर्जा आणि इंधनासाठी सुमारे २० लाख टन कोळशाचा वापर करतात. या उद्योगांना स्वच्छ व हरित इंधनाकडे वळण्यासाठी कमी व्याजदराची कर्जे, सरकारी करांमध्ये सवलती आणि हरित ऊर्जा निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, असे आशीष शेलार यांनी सुचविले.
...
वाहनांचे विद्युतीकरण
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक व खासगी वाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात तसेच वाहन उद्योग आणि खासगी कंपन्यांचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये बैठका आयोजित करून समस्यांवर उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी सूचना आशीष शेलार यांनी केली आहे.
...
प्रदूषमुक्तीसाठी सूचना
- प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर रस्ते धुणे व पाण्याची फवारणी
- रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे
- तीव्र प्रदूषण असलेल्या ठिकाणी व प्रमुख वाहतूक चौकांमध्ये अँटी-स्मॉग गन व मिस्ट स्प्रेअरचा वापर
- बांधकामस्थळांवर सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसविण्याची कार्यवाही पूर्ण करा
- ८७ बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Supreme Court SIR hearing: ''विरोधकांच्या याचिका केवळ एका बातमीवर आधारलेल्या'', SIR प्रकरणी निवडणूक आयोगाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

Maharashtra Live News: शेतकऱ्यांनी उसावर फिरवला नांगर

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

SCROLL FOR NEXT