मुंबई

शहरांना आकार नाही, शिस्त नाही; मग ७.८ टक्के जीडीपीचं काय करायचं?

CD

७.८ टक्के जीडीपीचं काय करायचं?
शहरांना आकार, शिस्त नाही; राज ठाकरेंचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : ‘‘शहर म्हणून आपण कोणतीही शिस्त पाळत नाही. पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रत्येक गोष्टीचे खापर पोलिसांवर फोडले जाते. शहरांना कोणताही आकार उरलेला नाही. फुटपाथवरून चालता येत नाही आणि चांगली मैदानेही राहिलेली नाहीत. देशाचा जीडीपी ७.८ टक्के असल्याचे सांगता; पण सामान्य माणसाचे जीवनच उद्ध्वस्त झाले असेल, तर या जीडीपीचे काय करायचे?’’ अशा आक्रमक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
नवी मुंबईत मनसे वाहतूक सेनेच्या वतीने व्यावसायिक वाहन प्रदर्शन आणि भव्य वाहतूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि सरचिटणीस नितीन खानविलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाषणात ठाकरे यांनी कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि ढासळत्या शहरी नियोजनावरून सरकारला लक्ष्य केले.
‘‘आज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. उद्या ही वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि सर्व जण रस्त्यावर गाड्या घेऊन आले, तर बाहेर कसे पडणार? गाडी कुठे उभी करावी, यापासून सार्वजनिक वाहतुकीचा वापर कसा करावा, याबाबत आपल्याकडे कोणताही विचार किंवा शिस्त नाही,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या प्रदर्शनात टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड आणि आयशर यांसारख्या नामांकित कंपन्यांनी अत्याधुनिक व्यावसायिक वाहने प्रदर्शित केली होती. या मेळाव्याला मनसे नेते अविनाश जाधव, मनसेचे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे, वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख, महिला सेनेच्या शहराध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------
शिस्तीसाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी
‘‘वाहतूक सिग्नल कोणी पाळत नाही. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी येते, याची मी वाट पाहत आहे. सत्तेत आलो, तर राज्यात अशी शिस्त आणून दाखवेन. हे काही रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी केवळ प्रबळ इच्छाशक्ती लागते,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहर विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करताना तज्ज्ञांना विश्वासात घेण्याऐवजी तो केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी आणि जमिनी विकण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-----------------------
लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातील फरक
शहरी नियोजन आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला माणूस मंत्रिपदावर बसतो, तेव्हा त्याला मुंबई, नवी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांचे गुंतागुंतीचे प्रश्न समजू शकत नाहीत. शहरात रस्ते, पाणी, वीज, शाळा आणि रुग्णालये दिसली की त्यांना सर्व काही आलबेल असल्याचे वाटते. त्यांच्या भागातील पाणी, रस्ते आणि भारनियमनाच्या तुलनेत शहरं त्यांना समृद्ध वाटतात. हा केवळ दृष्टिकोनातील फरक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

SCROLL FOR NEXT