मुंबई

भीमाशंकरलगतच्या वृक्षतोडी विरोधात हरित लवादाकडे धाव

CD

वृक्षतोडीविरोधात हरित लवादाकडे धाव
जंगल वाचविण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीचा पुढाकार

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : कोट्यवधी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी जोडलेल्या पेज नदीच्या खोऱ्यातील जंगलावर वृक्षतोडीची टांगती तलवार आहे. कर्जत-भीमाशंकर पट्ट्यातील जलविद्युत प्रकल्पासाठी प्रस्तावित ३२ हजारांहून अधिक झाडांच्या तोडीला उल्हास नदी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. जलस्रोत, वन्यजीव आणि आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण विभागाकडे धाव घेत वृक्षतोड तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.
पेज नदीच्या खोऱ्यात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्जत-भीमाशंकर पट्ट्यात टोरंट पॉवर कंपनीच्या ३,००० मेगावॉट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी सुमारे ६०० एकर वनक्षेत्रातील ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली. सायडोंगर परिसरातील या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १३,५०० ते १५,००० कोटी रुपये आहे.
भीमाशंकर अभयारण्यालगतच्या जंगलातील वृक्षतोडीमुळे जैवविविधता, जलस्रोत आणि स्थानिक आदिवासींच्या जीवनावर परिणाम होण्याची भीती उल्हास नदी बचाव कृती समिती, हुतात्मा दिलीप कपोते फाउंडेशनने व्यक्त केली आहे. यावर त्यांनी राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण विभागाकडे धाव घेत वृक्षतोडीवर बंदीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

SCROLL FOR NEXT