मुंबई

झोपडपट्ट्यांमध्ये हवे अंकुश!

CD

झोपडपट्ट्यांमध्ये हवे अंकुश!
रात्री-बेरात्री फटाके वाजवण्यावर न्यायालयाची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये रात्री-बेरात्री वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणात भर पडते. झोपडपट्ट्यांमधील ध्वनी आणि वायुप्रदूषण हा गंभीर मुद्दा असून, त्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २६) चिंता व्यक्त केली. महापालिका, पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यासंदर्भात योग्य ती पावले उचलावी तसेच त्यासाठी सर्वत्र जनजागृती करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.
राज्यासह मुंबईतील वाढत्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सोमवारी न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबईतील ६० टक्के भाग झोपडपट्टी आणि लहान वस्त्यांनी व्यापला आहे. सणासुदीत झोपडपट्यांमध्ये मध्यरात्री दोन वाजेपर्यंत फटाके फोडले जातात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी योग्यवेळी पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका, एमपीसीबीसह स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, केवळ जनजागृती मोहिमा किंवा सार्वजनिक सूचना देऊन चालणार नाही; प्रत्यक्ष अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे. मुंबईकरांना शुद्ध आणि चांगली हवा मिळायलाच हवी. शेवटी सर्वसामान्यांचे उत्तम आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही स्पष्ट करून न्यायालयाने पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला ठेवली.

कौतुक आणि नाराजीही
महापालिकेच्या वतीने आयुक्त अश्विनी भिडे, पोलिस प्रशासनाच्या वतीने आयुक्त देवेन भारती आणि एमपीसीबीकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात प्रदूषण नियंत्रणाबाबत उचलेल्या पावलांची माहिती देण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिका, पोलिस आणि एमपीसीबीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, जोपर्यंत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत केवळ नोटिसा बजावणे आणि जनजागृती मोहीम राबवणे पुरेसे ठरणार नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. त्याचवेळी याआधी दिलेल्या आदेशांचे पालन करण्याची गती फारच संथ असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

प्रदूषणावर भरभरून लिखाण
मागील १५ दिवसांपासून मुंबई धुरक्यात हरवली आहे. मुंबईतील हवा, दृश्यमानता, प्रदूषणावर पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ भरभरून बोलत आहेत. वर्तमानपत्रांतही सखोल वार्तांकन होत आहे. न्यायालयाचा सण-उत्सवांना विरोध नाही; मात्र ते जबाबदारीने साजरे करावेत, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

कलाकारांवर पैसे उधळू नका
ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्याच्या जनजागृतीसाठी स्वेच्छेने येणाऱ्या कलाकारांनाच या उपक्रमात सहभागी करून घ्या. हे समाजकार्य आहे, त्यासाठी सर्वसामान्यांच्या कराचे पैसे कलाकारांवर उधळू नका. अनेक नामवंत कलाकार पोलिसांच्या कार्यक्रमात स्वेच्छेने सामील होतात हे विसरू नका, असेही न्यायालयाने सुनावले. तसेच यासाठी मराठी कलाकारांचा विचार करण्याबाबतही न्यायालयाने सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT