साईली राणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
३२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेसह गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात
मुंबई, ता. २७ ः मुंबई महापालिका शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, विशेष शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील गुणवंत आणि प्रयोगशील ५० शिक्षकांचा मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते आदर्श महापौर शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज भांडुप येथील सहाय्यक शिक्षिका साईली संदेश राणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात गेली ३२ वर्षे कार्यरत राहून शिस्तप्रियतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे संपूर्ण शाळेत विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना फी, गणवेश, पुस्तके व वह्या या माध्यमातून आर्थिक सहाय्य करतात. शिक्षणासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. अभ्यासू आणि तंत्रस्नेही असलेल्या साईली राणे यांनी आतापर्यंत विविध शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती, पीपीटी निर्मिती केली असून, आपल्या उत्कृष्ट निवेदन शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी तालुकास्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांनी तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
या सोहळ्याला शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिनी जाधव, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेविका राजेश्री भाटणकर, नगरसेविका मेहजाबीन अतीक अहमद खान, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रेय वारे गुरुजी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.