मुंबई

वृक्षांवर जाहिरातींचे ओझे

CD

वृक्षांवर जाहिरातींचे ओझे

बॅनर हटविण्यासाठी प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा

कासा, ता. २७ (बातमीदार) : एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना, दुसरीकडे डहाणू तालुक्यातील डहाणू शहर, चारोटी आणि कासा परिसरात झाडांवर अनधिकृत जाहिरात बॅनर लावण्याचे प्रकार वाढत आहेत. लग्नसमारंभ, वाढदिवस, राजकीय कार्यक्रम आणि विविध उद्घाटनांसाठी लावलेले बॅनर कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक महिने हटविले जात नसल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. विशेष म्हणजे, बॅनर बांधण्यासाठी झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकले जात असल्याने वृक्षांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
कासा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता कामडी म्हणाल्या, ‘‘कासा परिसरात झाडांवर आणि मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत बॅनर लावल्याचे निदर्शनास आले आहे. असे बॅनर हटविण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. यापुढे बॅनर लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार असून, त्यासाठी नियमावली तयार केली जात आहे. ‘‘पर्यावरणप्रेमी आशीष चव्हाण म्हणाले, ‘‘कार्यक्रमाचे बॅनर कार्यक्रम संपल्यानंतर दोन दिवसांत काढले पाहिजेत. झाडांवर खिळे ठोकून बॅनर लावल्याने झाडांचे नुकसान होते. प्रशासनाने अशा अनधिकृत बॅनरची दखल घेऊन ते तातडीने हटवावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT